आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

येरवडा जेलचे अधिक्षक उमाजी पवार यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे गौरव

maharashtrajainwarta • Previous Issue • July 21, 2021
Spread the love

ग्लोबल प्लेज कॅम्पेन उपक्रमाअंतर्गत ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ने सन्मान

पुणे : अभिजीत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

येरवडा जेलचे अधिक्षक उमाजी पवार यांच्या कार्याची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला असून, ग्लोबल प्लेज कॅम्पेन उपक्रमाअंतर्गत त्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ने सन्मानित केले आहे. वर्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या समितीकडून त्यांना नुकतेच गौरविण्यात आले.

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना मागील दीड वर्षापासून प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झालेला दिसून येत आहे, तसेच प्रशासनाच्या प्रत्येक विभागाला कोरोना विषाणूने ग्रासलेले आहे. मात्र दीड वर्षात कोरोनाचा दोन्ही लाटेत येरवडा मध्यवर्ती कारागृहात जी उपाययोजना केली गेली होती, त्याचे कौतुक जागतिक स्तरावर केले जात आहे, येरवडा कारागृहाचे अधिक्षक उमाजी पवार यांच्या नियोजनामुळे कारागृहातील एकाही कैद्यास कोरोनाचे संक्रमण झाले नाही.
येरवडा कारागृहात सहा हजार कैदी आहेत आणि त्या पैकी चार हजार कैद्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोना काळात सतर्कता दाखवत अधिक्षक पवार आणि त्याचे सहकार्‍यांनी जेलमध्येच मुक्काम केला आणि जे जेवण कैद्याना दिले जात होते, तेच जेवण सर्व अधिकारी करत होते.
येरवडा जेलच्या या कामगिरीचा लेखा जोखा लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने पाहिला आणि त्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ने सन्मानित केले.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे जगभरातील 100 देशांमध्ये ग्लोबल प्लेज कॅपेन हा उपक्रम सुरू आहे, ज्या अंतर्गत कोरोना काळात प्रभावी आणि सर्वोत्कृष्ट कारागिरी बजावणार्‍या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जागतिक स्तरावर केला जात आहे. सदर जागतिक उपक्रमात येरवडा जेलचे अधिक्षक उमाजी पवार यांचे कार्यदेखील नोंदवले गेले आहे.