आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कात्रज प्राणिसंग्रहालयात आता शेकरू व रानमांजर

maharashtrajainwarta • Previous Issue • July 21, 2021
Spread the love

राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन: वसंत मोरे यांचे प्रयत्न

पुणे : अभिजीत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता शेकरू व रानमांजर पाहता येणार आहे.कात्रज उद्यानात शेकरुंचे एक जोडपे प्रजननासाठी आणण्यात आलेले आहे. त्याचबरोबर रानमांजरांची तीन जोडपीही येथे आणण्यात आलेली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दि. 21 ज़ुलै रोजी या प्रकल्पाची सुरुवात झाली. नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून हे सुरू झाले आहे.

यावेळी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनर, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, मनसे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे, मनसे नेते अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, ऍड गणेश सातपुते, रुपाली ठोंबरे पाटील, संचालक राजीव गांधी प्राणी संग्रहालय राजकुमार जाधव, किशोर शिंदे, बाबू वागसकर, योगेश खैरे, जयंत गिरी, मंगेश रासकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्या कामाचे कौतुक केले. आमचा ‘वसंत जे करणार ते भव्यच आणि वेगळेच’ हे ठाकरे यांचे शब्द वसंत मोरे यांना विविध कामे करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत असतात. वसंत मोरे यांनी आपल्या विकास कामातुन कात्रजचे नाव सर्व देशात केले आहे. कात्रज मधील बागा, स्मशानभुमी, कात्रज तळे, पाहण्यासाठी नागरीक अनेक ठिकाणावरुन येत असतात. कात्रज करांच्या वतीने यावेळी राज ठाकरे याचे भव्य स्वागत करण्यात आले.