आवृत्ती पुणे
← Back to Homepage

येरवड्यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमास अटक, 14 लाखांचा माल जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue, Social • May 8, 2023
Spread the love

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना मिळालेल्या महितीनुसार एमडी हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी व्यक्ती येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

कारवाईत अली शेर लालमोहम्मद सौदागर, वय 61 याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 14 लाख रूपये किंमतीचे 70 ग्रॅम एम.डी हा पदार्थ तसेच मोबाईल व वजन काटा असा 4 हजार रूपये किंमतीच्या मुद्देमालासह एकूण 14 लाख 4हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीवर येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे मा.अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे 2 चे पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, पोलिस उपनिरिक्षक दिगंबर चव्हाण यांच्यासह पो अमलदार रविंद्र रोकडे, चेतन गायकवाड, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, प्रशांत बोमदंडी, अझीम शेख, संदीप जाधव, महेश साळुंखे, पोलिस शिपाई दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली होती.

get_footer();