आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवैध गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन व्यक्ती खडकी पोलिसांकडून जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue, Social • May 8, 2023
Spread the love

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : येथील खडकी परिरसरातल्या मुळा रोड इथे दोन इसम अवैध गांजाविक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाल्या वरून दोन व्यक्तींना खडकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी नवीन पिल्ले, वय वर्षे 34 रा. खडकी, व जितेंद्र मुलगानी वय वर्ष 32 रा. भोसरी या दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींकडे दोन गाड्या असून दोन ट्रॅव्हल बँग मध्ये गांजा असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार या दोघांकडून अनुक्रमे दो दुचाक्या आणि 11 -11 किलो असा 22 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. सद आरोपींना अटक करून न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्यांना 10 मे पर्यंत पोलिस कोठडी मंजूर झाली आहे.
पुणे शहर पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, , पुणे शहर परिमंडळ ०४ चे पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, पुणे शहर खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, पुणे शहर खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटीन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम, सहायक पोलिस फौजदार भानुदास भालेराव, सहायक पोलिस फौजदार तानाजी कांबळे,पोलिस नाईक निकाळजे, पोलिस नाईक कलंदर, पोलिस नाईक शेख, पोलिस शिपाई जहांगिर पठाण, पोलिस शिपाई अनिकेत भोसले, पोलिस शिपाई ऋषिकेश दिघे, पोलिस शिपाई जाधव, पोलिस शिपाई शिवराज खेड यांनी ही कारवाई केली. केली. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उप निरीक्षक वैभव मगदुम करीत आहेत.

get_footer();