आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ऑनलाईन मनी ट्रान्सफर दुकानदारांची फसवणूक करणारा भामटा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • May 13, 2023
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : सासरे आजारी असल्याची थाप मारून रूग्णालयाचे बिल भरण्यासाठी एका दुकानदाराची 30 हजार आणि मोबाईल रिचार्ज करून 240 अशी तर दुसऱ्या दुकानदाराचीही 30 हजार रूपये अशी एकूण 60 हजार 240 रूपयांची फसवणूक करणाऱ्या अभिषेक तांबे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

या दोन्ही घटना याच महिन्यात घडल्या आहेत. या संदर्भात फिर्यादी मनोज आवलिंगे यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपी अभिषेक तांबे याने सासरे आजारी असल्याचे सांगून 30 हजार रूपये ट्रान्सफर करून घेतले. तर जे.आर.एस मोबाईल शॉप चे मालक अरीफ शेख यांच्याकडूनही त्याने 30 हजार रूपये ट्रान्सफर करून घेतले. मात्र दोघांनाही पैसे परत केले नाहीत.
पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक विश्लेषण करून शोध घ्यायला सुरूवात केली.
पोलिस अंमलदार चेतन गोरे, निलेश ढमढेरे यांना आरोपी कात्रजच्या सच्चाईमाता इथे असल्याचे समजले. अंमलवार यांनी संपूर्ण कात्रज, आंबेगाव, सच्चाईमाता परिसराची संपूर्ण पाहणी केली. मोबाईल क्रमांकावरून आरोपी जैन मंदिर, सच्चाईमाता कात्रज, पुणे इथे राहात असल्याचे समजले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.
आरोपीकडे आणखी तपास केला असता त्याने आणखी काही मनी ट्रान्सफर करणाऱ्या व्यावसायिकांची फसवणूक केल्याची कबूली दिली आहे. त्यामुळे आरोपीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कारवाई परिमंडळ २ च्या पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश ढमढेरे, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, हर्षल शिंदे, सचिन गाडे, मंगेश पवार, धनाजी धोत्रे, अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमले राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();