आवृत्ती पुणे
← Back to Homepage

११ लाख रूपये किंमतीच्या एमडी या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • May 15, 2023
Spread the love

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

येरवडा : येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पेट्रोलिंग सुरू असताना पोलिस अंमलदार साहिल सय्यद व अझीम शेख यांना मिळालेल्या खबरीनुसार, कल्याणीनगर मेट्रो ब्रीज जवळ अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना अटक केली.

फैयाज युसूफ शेख वय ३२,(रा. कुद्रात बिल्डिंग, भागोदयनगर, कोंढवा, पुणे) आणि गौरव किरण गायकवाड वय २८ (रा. मधुमीलान काम्प्लेक्स D बिल्डिंग NIBM रोड कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या दोघांकडून ११ लाख २० हजार रुपये किमतीचा ५६ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ व ७० हजार रूपयांचे ३ मोबाईल फ़ोन व २ हजार रूपये किंमतीचे दोन वजन काटे असा एकूण ११ लाख ९२ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या दोघांविरूद्ध येरवडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरील कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, गुन्हे २ चे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, पोलिस अमलदार युवराज कांबळे, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, साहिल सय्यद, अझीम शेख, संदीप जाधव, दिनेश बस्तेवाड, रविंद्र रोकडे यांनी केली.

get_footer();