आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली वाहातूक पोलिस, पालिका अधिकारी, स्थानिक नागरिकांची उपस्थिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांना तोंड दाव्या लागणाऱ्या वाहातूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत वाहातुकीच्या अडचणी नागरिकांकडून मांडण्यात आल्या. वाहातुकीच्या अडचणींबाबत 40 लेखी तक्रारी आमदार शिरोळे यांना मिळाल्या होत्या. त्यापैकी 10 अर्जांचे निराकरण त्वरीत कऱण्यात आले.
उर्वरीत तक्रारींच्या निवारणासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच चतुःश्रृंगी, खडकी परिसरात रस्त्यांवरील वेगवान गाड्यांवर चाप बसण्यासाठी रम्बलर्स पट्टे आखणे, गरज असेल त्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करणे याविषयीही चर्चा करण्यात आली. वाहातुकी संदर्भातल्या उर्वरीत तक्रार अर्जांच्या उपाय योजना कऱण्यासाठी पालिकेकडे पत्र्यव्यवहार कऱण्यात आला आहे. त्यात दीप बंगला चौक, शिवाजीनगर एस.टी. स्टँड चौक, भाले चौक, मेडीपॉईंट चौक, आंबेडकर चौक या ठिकाणच्या वाहातूक समस्यांबाबत चर्चा झाली. पोलिस अंमलदार व ट्रॅफिक वॉर्डन यांची नेमणूक करण्यासाठी नियोजन यावेळी करण्यात आले. आमदारांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच अशा प्रकारची बैठक आयोजित कऱण्यात आली होती. या बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. या बैठकीला मुख्य अभियंता गोंजारी, पुणे महापालिका, पथ, अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, मलनिःस्सारण विभाग, उद्यान विभागाचे अधिकारी, टाटा मेट्रो, महामेट्रो, पी.एम.आर.डी.ए यांच्याकडील अधिकारी उपस्थित होते. तसेच डेक्कन, शिवाजीनगर, चतुःश्रृंगी, खडकी परिसरात राहाणारे 70 ते 80 नागरिक उपस्थित होते.
यावेळी वाहातूक शाखेतील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलिस हवालदार सतीश सोनवणे, पोलिस नाईक रविंद्र शेडगे, पोलिस शिपाई सागर वाघमारे, पोलिस हवालदार शिवाजी कुचेकर यांचा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
