आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रामदास शेळके यांनी स्वीकारला प्रभारी पोलीस निरीक्षकाचा प्रभार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue, Social • August 21, 2021
Spread the love

बार्शी शहर पोलीस ठाणे : मावळते निरीक्षक संतोष गिरीगोसावींकडून सूत्रे ताब्यात

पवन श्रीश्रीमाळ

महाराष्ट्र ३६० न्यूज

बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची सोलापूर पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्षात बदली झाली असून, गुरुवारी (ता. 19) सकाळी नूतन प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गिरीगोसावी यांच्या कढून पदभार स्वीकारला.

गिरीगोसावी यांनी शहर पोलीस निरीक्षक पदावर सुमारे दोन वर्षे काम पाहिले. 1 ऑक्टोबर 2019 रोजी गिरीगोसावी हे बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर रूजू झाले होते. बार्शी विधानसभा निवडणुक 2019 च्या तोंडावर त्यांनी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून पदभार स्वीकारून विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडली. दरम्यान, मार्च 2020 पासून कोरोना काळात शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पोलीस प्रशासनाकडून आलेल्या वेळोवेळीच्या सूचनांचे पालन करत उत्कृष्ट पोलिसिंग केले. मागील दोन वर्षांच्या कालावधीत शहरात कायदा सुव्यवस्था व शांताता राखण्याकामी प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून चांगली कामगिरी केली. राष्ट्रपती पारितोषिक विजेते पोलीस निरीक्षक म्हणून गिरीगोसावी यांनी बार्शी शहरात केलेल्या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडून त्यांचे वेळोवेळी कौतुकही झाले आहे.

नूतन पोलीस निरीक्षक शेळके यांनी यापूर्वी जेजुरी, जत येथे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेळके यांची शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे.