माणुसकीची संवेदना जपण्यासाठी लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन यांचा उपक्रम
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
ऊन-वारा-पावसात फुटपाथवर उघड्यावर व्यवसाय करणार्या बांधवांची गरज ओळखून ‘लिओ क्लब ऑफ बार्शी टाउन’तर्फे त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. माणुसकीची संवेदना जपण्याच्या उद्देशाने लिओ क्लब यांनी आयोजलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
कोरोनाच्या वैश्विक महामारीत प्रचंड मोठी बेरोजगारीची कुर्हाड कोसळलेल्या व हातावर पोट असलेल्या ऊन-वारा-पावसात फुटपाथवर उघड्यावर व्यवसाय करणार्या बांधवांना लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनकडून अचानकपणे एक अनोखी भेट देण्यात आली. या कष्टकर्यांची गरज ओळखून त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या अचानक मिळालेल्या छत्रीच्या भेटीने त्यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. पावसात व्यवसायासाठी डोक्यावर छत्रीच्या रूपाने आसरा दिल्याबद्दल लाभार्थींनी लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनचे आभार मानले.
छत्र्यांचे वाटप करतेवेळी लिओ क्लबचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ म्हणाले की, “या उपक्रमातून खर्या गरजूंना मदत मिळावी, हा हेतू आहे. कष्टकरी बांधव मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीत सर्वसामान्य हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला होता, त्यांना लिओसारख्या विविध सामाजिक संघटनांनी आधार देण्याचे कार्य केलेच आहे. पण सध्यादेखील पावसाची तीव्रता वाढत असताना हातावर पोट असलेले कष्टकरी बांधव दुर्लक्षित राहू नयेत, या भावनेने माणुसकीची संवेदना जपण्याचे कार्य लिओ क्लब ऑफ बार्शी टाउन तर्फे करण्यात आले आहे.”
या घेतलेल्या प्रेरणादायी उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी लिओ अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ, लिओ सचिव आदित्य सोनिग्रा, खजिनदार अक्षित परमार, उपाध्यक्ष यश मेहता, सायली श्रीश्रीमाळ, श्रद्धा तातेड, सलोनी भाटे, शुभम लाड, डॉ. वत्सल राठोड, सागर तातेड, शुभम बाफना, स्वराज लोखंडे, गौरव डेडिया, श्रवण भराडिया, रोहन मुंडे, दिव्यांश पुनमिया, ओंकार बजाज, आदित्य बुड़ुक, सिद्धांत पवार, अश्विन दोशी यांनी परिश्रम घेतले.
बार्शीचे नगराध्यक्ष अॅड. आसिफ तांबोळी, तसेच अजित कुंकुलोळ, बाळासाहेब तातेड, बाळासाहेब श्रीश्रीमाळ लायन्स अजित देशमुख, अॅड.वासुदेव ढगे, आनंद पुनमिया, अतुल सोनिग्रा यांनी लिओच्या सर्व सदस्यांना या उपक्रमासाठी शबासकीची थाप दिली.
