आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाढदिवसाचा केक धारदार तलवारीने कापून दहशत माजविणार्‍या दोघांना अटक

maharashtrajainwarta • Previous Issue • August 8, 2021
Spread the love

दत्तवाडी पोलिसांची कारवाई : सात तलवारींसह तलवार बनवणाराही ताब्यात

पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

वाढदिवसाचा केक धारदार तलवारीनी कापून दहशत माजविणार्‍या दोघांना दत्तवाडी पोलिसांची अटक केली असून, याकामी सात तलवारींसह तलवार बनवणार्‍यालाही ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रमोद खरात हे करीत आहेत.

पुणे शहरात गुन्हेगार आणि युवक धारदार हत्यारांचा वापर करून वाढदिवसांचे केक सार्वजनिक ठिकाणी धारदार हत्यारांनी कापून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करू नये, या अनुषांगाने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून वेळोवेळी प्राप्त सूचनांनुसार दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांनी दत्तवाडी तपास पथकाला हद्दीतील झोपडपट्टया आणि इतर वसाहती यातील उपद्रवी युवक व गुन्हेगार यांच्या व्हॉट्सअप व इतर सोशल मिडिया ग्रुपवर येणार्‍या गुन्हेगारी कृत्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, 06 ऑगस्ट रोजी दत्तवाडी पोलीस स्टेशनकडील तपासपथक अधिकारी व कर्मचारी हे हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अमंलदार विष्णू सुतार, शरद राऊत व राहुल ओलेकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही दिवसांपूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करून त्यांचे फोटो व्हॉटसप स्टेटसला ठेवून दहशत निर्माण करणारे दोन युवक हे राममंदिराजवळ, जनता वसाहत, पुणे येथे हातामध्ये हत्यारे घेऊन थांबलेले आहेत.” सदर बातमीची खात्री करुन पोलीस उपनिरिक्षक स्वप्निल लोहार व तपासपथक कर्मचारी यांनी सापळा रचून जनता वसाहतीतील 19 वर्षीय दोन युवकांना हत्यारांसह पकडले.
सदर युवकांकडून पोलीस पद्धतीने चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्याकडील तलवारी ह्या त्यांच्या ओळखीच्या भोरमधील एका लोहाराकडून घेतल्याचे सांगितल्याने व तो लोहार सध्या त्यांना अजून हत्यारे देण्यासाठी जनता वसाहत परिसरात आल्याचे सांगितले. त्यानुसार लागलीच कारवाई करुन पोलिसांनी हत्यारे बनविणार्‍यास लोहाराससुद्धा अटक केली आहे. सदर तिन्हीही इसमांना अटक करून त्यांच्याविरुद्ध दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून एकूण सात प्राणघातक धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारे आरोपी हे जनता वसाहत परिसरात राहण्यास असून, त्यांना परिसरात दहशत निर्माण करावयाची असल्याने त्यांनी एकाचा महिन्यापूर्वी जनता वसाहत डोंगराच्या बाजूला तलवारीने केक कापून त्याचे फोटो काढून व्हॉट्सप व इतर सोशल मीडियावर लोड केले होते. परंतु दत्तवाडी पोलिसांनी सर्तकपणे सोशल मीडियावर लक्ष ठेवून कारवाई करीत आरोपींवर कायदेशीर कारवाई केली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रमोद खरात हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राजू जाधव, पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, विष्णु सुतार, शरद राऊत, राहुल ओलेकर, भरत आस्मर, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले यांनी केली आहे.