आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घरकाम करणाऱ्या महिलेने केले लाखो रुपये साफ!

maharashtrajainwarta • Previous Issue • August 15, 2021
Spread the love

बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील घटना : डॉक्टरच्या आई-वडिलांची करीत होती सेवा

पुणे : महाराष्ट्र ३६० न्युज

पूना क्लब भागात राहत असलेल्या एका महिला डॉक्टरने आपल्या आई-वडिलांच्या सेवेसाठी कामावर ठेवलेल्या कामवाल्या बाईने सेवा करीत करीत लाखो रुपयांचा मेवा खाल्ल्याची घटना समोर आली आहे.

याविषयी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये एका महिला डॉक्टरने तक्रार दिली आहे. १२ मे २०२१ पासून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्वयंपाकाचे काम करण्यासाठी एक महिला कामाला ठेवली होती. घरातील तिजोरीतील पैसे अनेक वेळा गायब होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना ही कामवाली पैसे चोरत असल्याचे लक्षात आले. तीन-चार वेळा चोरी करून तिने सुमारे चार लाख रुपये चोरले असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. आपली चोरी उघड झाली, आता आपल्याला हे लोक पोलिसांच्या ताब्यात देतील, या भीतीने तिने एक लाख १४ हजार थोडे थोडे करून परत केले. मात्र पुढचे पैसे, म्हणजेच 2 लाख ८६ हजार रुपये न देताच तिने या भागातून पळ काढला आहे. त्यामुळे या महिला डॉक्टरने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे करीत आहेत.