महाराष्ट्र ३६० न्यूज
पुणे :धायरी येथील हॉटेलमध्ये बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची शाब्दिक चकमक झाल्याने साथीदारांना बोलावून लोखंडी हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हॉटेलमालक आणि कामगार जखमी झाले. आरोपींनी आजूबाजूच्या दुकानदारांनाही शिवीगाळ- दमदाटी करीत आरोपी पसार झाले. ही घटना शनिवारी (दि. २१ ऑगस्ट) दुपारी चारच्या सुमारास घडली.
मयूर मते (वय ३३, रा. धायरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मते यांचे धायरी (गणेशनगर) येथे गारवा बिर्याणी हॉटेल आहे. आरोपी दुपारी चारच्या सुमारास बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यावेळी शाब्दिक वादावादी झाल्याने त्यांनी साथीदारांना बोलावून लोखंडी हत्याराने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने वार खुर्चीने अडवला. यावेळी हॉटेलमधील मोकळी पातेली, झाकणे, खुर्च्या, ट्रे फिर्यादी व कामगार अश्फाक, इसराफिल व इतर कामगारांना फेकून मारून जखमी केले. दरम्यान, हॉटेलबाहेर जमले्लया लोकांना आणि आजूबाजूच्या दुकानदारांना आरोपींनी शिवीगाळ करीत दमदाटी करून दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणाचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर पुढील तपास करीत आहेत.
















