आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गोडाऊनमधील माल स्क्रॅपमध्ये विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 24, 2021
Spread the love

युनिट-४ची कारवाई : आठ वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : कोंढवा परिसरातील पत्रा, वायर, तेलाच्या गोडाऊनमधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनीट-४च्या पथकातील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध आठ गुन्हे दाखल असून मागील आठ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

दयानंद झा (वय 42, रा. चिखली, मुळ रा. बिहार) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध वस्तु खरेदी-विक्रीचे गोडाऊन आहेत. आरोपी झा हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने या परिसरातील गोडाऊनमध्ये चोरी करून त्यातील पत्रा, वायर, तेलाचे डबे यांसारख्या वस्तु चिखली येथील स्क्रॅपच्या व्यावसायिकांना विक्री करीत होता. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गोडाऊन फोडीचे आठ गुन्हे दाखल होते.

तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. मागील काही वर्षांपासून तो बिहारमधील त्याच्या मुळ गावी गेला होता. त्यानंतर मागील वर्षापासूनच तो पिंपरी-चिंचवड येथील चिखली, पिंपरी परिसरामध्ये राहात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकातील पोलिस कर्मचारी राजस शेख यांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनानुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलिस कर्मचारी राजस शेख, दिपक भुजबळ, प्रवीण भालचिम, प्रवीण कराळे, शितल शिंदे यांच्या पथकाने चिखली परिसरात सापळा रचून त्याला पिंपळे सौदागर येथील कृष्णा चौकातील अगरवाल पॅकर्स ऍन्ड मुव्हर्स येथे जेरबंद केले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने संबंधीत गुन्हे हे त्याच्या साथीदारांसह केल्याचे तसेच गुन्हे केल्यापासून तो बिहारला गेल्याची माहिती देत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.