आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोयत्याने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न करणारे पाच जण जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 24, 2021
Spread the love

बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई : एक आरोपी दोन वर्षांसाठी होता तडीपार

महाराष्ट्र ३६० न्यूज

बिबवेवाडी (अप्पर इंदिरानगर) परिसरात युवकाच्या डोक्यावर सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यां पाच जणांना बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले. त्यांच्याकडून हत्यारे जप्त केली असून, त्यातील एक आरोपी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार असल्याने पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींच्या वेळीच मुसक्या आवळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सौरभ शरद शिंदे, अक्षय संजय अभंग, आकाश कपील गोरड, चंदन हुनाप्पा राठोड, ऋषिकेश ऊर्फ श्री किशोर शिंदे (सर्व रा. व्ही.आय.टी. कॉलेजजवळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

  दाखल गुन्ह्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील प्रभारी अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी अप्पर बस डेपो येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार अतुल महांगडे व अमित पुजारी यांना सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना २४ तासांत जेरबंद केले. आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, विधिसंघर्षित बालकाची बालसुधारगृह येरवडा येथे रवानगी केली आहे. गुन्ह्यातील हत्यारे जप्त केली. बिबवेवाडी पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

     अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षिका अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार अमित पुजारी, अतुल महांगडे, श्रीकांत कुलकर्णी, सतीश मोरे, तानाजी सागर, राहुल शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.