आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अग्निशस्त्र बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 24, 2021
Spread the love

खंडणीविरोधी पथक-२ची कारवाई : चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : वानवडीतील फातिमानगर रस्त्यावरील चहाच्या दुकानासमोर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. खंडणीविरोधी पथक-२ने ही कारवाई केली. एकूण चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

   मलेश सारंग वेलायधन (वय २५, रा. घोरपडीवस्ती, श्रीवस्तीनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास करीत असताना वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी फातिमानगर रस्त्यावरील येवले अमृततुल्य चहा सेंटरसमोर एक संशयित व्यक्ती फिरत असून, त्याच्या कमरेला पिस्तुल असल्याची माहिती पोलीस हवालदार शैलेश सुर्वे आणि पोलीस नाईक सचिन अहिवळे यांना सूत्रांकडून कडून मिळाली. त्यानुसार तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतूस अशी एकूण ४० हजार ५०० रुपयांची अग्निशस्त्रे मिळून आली. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत अवचरे, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, पोलीस हवालदार साळुंके, उत्तरकर, सचिन अहिवळे, विजय गुरव, अमोल पिलाने, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.