आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

संशयावरून पत्नीच्या पोटात चाकू खुपसून केला खून

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 24, 2021
Spread the love

आरोपी जेरबंद : वाघोली लेबर कॅम्पमधील घटना

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

माझ्या भावाशी सारखे बोलत असल्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटात सुरा खुपसून गंभीर जखमी करीत खून केला. वाघोली गावच्या हद्दीत लेबर कॅम्पमध्ये ही घटना सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) पहाटे पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पती आरोपीस लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

अनु राजू मर्झा (वय २८, रा. लेबर कॅम्प, वाघोली, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी राजेश मिर्झा (वय २२, रा. लेबर कॅम्प, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पती राजू पुनाराम मिर्झा (वय ३०, रा. सध्या कांचन हॉटेल, खांदवेनगर, वघोली, ता. हवेली, मूळ गाव- खिसोरा, मोथाण, जि. बिनेतरा छत्तीसगड) या अटक केली असून, त्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची वहिनी बी.जे.एस. कॉलेजसमोर मॅजेस्टिक सोसायटीच्या लेबर कॅम्पमधील पत्र्याच्या शेडमध्ये झोपली होती. आरोपीने दरवाजा वाजवून अनु मिर्झा यांना उठवले आणि तू बाहेर मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगितले. तू माझ्या भावासी सारखे बोलते असा संशय घेऊन फिर्यादीचे कुटुंबासोबत राहत असल्याचा राग मनात धरून आरोपीने धारदार चाकू अनु मिर्झा यांच्या पोटात खुपसून गंभीर जखमी करून खून केला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र तटकरे पुढील तपास करीत आहेत.