भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आठ गुन्हेगारांना शिताफीने घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार करणारऱ्या आठ सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले.
रविवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समृद्धी लेकशायर सोसायटीसमोर असलेल्या पानटपरीशेजारी जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द पुणे येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून बंटी येनपुरे, रोहित पाटेकर, आदित्य ऊर्फ बबलु फटके, लकी गायकवाड, शुभम हिरे, सार्थक मिसाळ, तुषार पवार, विजय दरोडे व त्यांच्यासोबत ३ ते ४ असे सर्वजण सदर ठिकाणी मोटारसायकलवर येऊन फिर्यादी नामे आकाश अरुण पवार (वय २४, रा. गणराज कॉलनी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव बु। पुणे) याला जिवे ठार मारण्याचा प्लॅन केला होता.
त्याप्रमाणे बंटी येनपुरे, रोहित पाटेकर, बबलू फटके आणि तुषार पवार यांनी त्यांच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादी नामे आकाश अरुण पवार व त्याचे मित्र प्रथमेश येनपुरे याचेसोबत थांबलेले असताना त्याचेजवळ जावून त्यांचे उजवे हाताचे मनगटाजवळ, पोटावर, पाठीवर व त्याचा मित्र प्रथमेश येनपुरे यास तुषार पवार याने डोक्यात लोखंडी कोयत्याने मारून त्यासदेखील जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना वस्ताद येनपुरे याने शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तेथील उभ्या वाहनांवर कोयत्याने मारून दहशत निर्माण करत तेथून निघून गेले म्हणून त्याचेविरुद्ध भारती विदयापीठ पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहपोलीस निरीक्षक आशिष कवठेकर हे करीत आहे.
सदर गुन्हयातील आरोपी हे गुन्हा केल्यापासून फरार होते, तसेच त्यांनी त्याचे मोबाईलसुद्धा बंद करून ठेवले होते, त्यामुळे आरोपीचा शोध घेणे कठीण व जिकरीचे होते. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पथकातील नितीन शिंदे, अंकुश कर्चे व तपास पथकांतीन अंमलदार आरोपीचा आंबेगाव पठार, दत्तनगर, खेङ शिवापूर, नसरापूर, फणसीगाव (वेल्हे), खडकवासला, वारजे, नऱ्हे, धायरी या परिसरात कसोशीने शोध घेत असताना आरोपी हे कात्रज नवीन बोगदा परिसरात येणार असल्याचे पोलीस अंमलदार अभिजित जाधव व शिवदत्त गायकवाड यांना समजल्याने तपास पथकांचे अधिकारी नितीन शिंदे, अंकुश कर्चे व तपास पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून त्यांना गाडीवरून पळत असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले व त्यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचेकडे चौकशी केली.
लकी अरुण गायकवाड (वय १९, रा. दत्तनगर पुणे), तुषार प्रकाश डोबे (वय २१), तेजस तुकाराम येनपुरे (वय १९), विधीसंघर्षित बालक रोहित दिलीप पाटेकर (वय १७), अदित्य जगमोहन सिंन्हा (वय १८), सार्थक संगीत मिसाळ (वय १९), शुभम रवींद्र हिरे (वय २१), तुकाराम रामचंद्र येनपुरे (वय ५२) (सर्व रा. दत्तनगर, जांभुळवाडी रोड, पुणे), अशी आरोपींची नावे असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
सदरची कारवाई ही, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, गप्पेश सुतार, शैलेंद्र साठे, सचिन पवार, नीलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर व शिवदत्त गायकवाड यांनी केली आहे.
