पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कात्रजमधील साईपार्क बिल्डिंग येथे भाजी खरेदी करीत असताना दोघांनी जबरदस्तीने मोबाईल चोरून नेला. ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
याप्रकरणी दत्तनगर (जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार लवित अप्पासाब कार्सर (वय ३०) आणि विनयकुमार कृष्णा गौड (वय १८, दोघे रा. कर्नुल जि. डोन, आंध्र प्रदेश) या दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ढमे पुढील तपास करीत आहेत.
