कोंढवा पोलिसांची कामगिरी : वानवडीतील सातवनगर येथे आरोपींना घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
परप्रांतीय कंटेनरचालकास लुटणाऱ्या तिघांना जेरबंद केले. त्याच्याकडून मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यासाठी वापरलेली कार जप्त केली. ही कारवाई कोंढवा पोलिसांनी सातवनगर वानवडी येथे केली.
अतुल विजय कचरावत (वय २५), प्रशांत लखन कचरावत (वय २७, दोघे रा. संतोषनगर रोड, सातवनगर, वानवडी), शुभम शशिकांत जगताप (वय २०, रा. हांडेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी हाकम अब्दुलमजीद (वय ५०, मु.पो. सिकरांवा, राजस्थान) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी सांगितले की, कंटेनरचालकाला लुटणाऱ्यांचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील आणि पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस हवालदार रमेश गरुड, ज्योतिबा पवार, सतीष चव्हाण, तुषार आल्हाट, लक्ष्मण होळकर, किशोर वळे यांच्यासह पथके तयार केली. त्यानुसार आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी वानवडी (सातवनगर) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून रोख पाच हजार रुपये आणि तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ह्युंदाई कार कार असा ऐवज ज्पत केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करीत आहेत.
