आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दारू पिण्यासाठी उसणे पैसे दिले नाही म्हणून मोबाईल चोरला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021
Spread the love

मार्केट यार्ड पोलीस स्टेशन : आरोपीवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क

दारू पिण्यासाठी उसणे पैसे दिले नाहीत म्हणून हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱ्यास मार्केट यार्ड पोलिसांनी जेरबंद केले. भाजीमार्केट, मार्केट यार्ड येथील २२७ गाळ्यासमोर दि. २९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.

बापू बुवाजी शिंदे (वय ३०, रा. शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सागर लोंढे (वय २७, रा. मार्केट यार्ड, पुणे) यांनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मार्केट यार्ड भाजी मार्केट येथील गाळ्यासमोर दि. २९ ऑगस्ट रोजी जेवण करून मोबाईलवर गेम खेळत होते. त्यावेळी आरोपीने दारू पिण्यासाठी ऊसणे पैसे मागितले. फिर्यादीने पैसे देम्यास नकार देताच हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेला असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.