आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुंबई-बंगलोर महामार्गावर वारजे माळवाडी येथे पादचाऱ्याचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021
Spread the love

अज्ञात वाहनाची बसली धडक : वाहनचालकावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

मुंबई-बंगलोर महामार्गावर वारजे माळवाडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव वाहनाची धडक बसून अपघात झाला. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्टेसनचे सहायक पोलीस फौजदार एस. एस. पाठक यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.