आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हडपसरमध्ये केळी खरेदी करताना ज्येष्ठ महिलेची मोहनमाळेची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021
Spread the love

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

हडपसर-मंत्री मार्केट येथे ज्येष्ठ महिला हातगाडीवर केळी खरेदी करीत होती, त्यावेळी अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मोहनमाळ व रोख दीड हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक केतन धेंडे पुढील तपास करीत आहेत.