आरोपी फलटण पोलीस स्टेशनच्या ताब्यात : धायरीगावामधून केले अटक
पुणे : महाराष्ट् न्यूज 360 न्यूज नेटवर्क
फरासखाना पोलिसांनी फलटण पोलीस स्टेशन, जिल्हा सातारा येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्यास फलटण पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.
बुधवारी (दि. ०१ सप्टेंबर) फरासखाना पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी अभिजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार वैभव स्वामी, राकेश क्षीरसागर, ऋषीकेश दिघे, समीर माळवदकर, सचिन सरपाले व समर्थ पोलीस स्टेशनकडील व सध्या सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे यांचेकडील मोक्का स्कॉडमध्ये कर्तव्यास असलेले पोलीस अंमलदार शाम सूर्यवंशी हे वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शाम सूर्यवंशी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फेत बातमी मिळाली की, फलटण पोलीस स्टेशन, सातारा जिल्हा येथील एका गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी राकेश रमेश निंबोरे (रा. मु.पो. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) हा , विजयनगर बस स्टॉपवर उभा आहे.
त्यानुसार वरील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार हे धायरीगाव, विजयनगर बस स्टॉपवर गेले असता सदर आरोपी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता फलटण पोलीस स्टेशन, सातारा जिल्हा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उप-आयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस अंमलदार शाम सूर्यवंशी, वैभव स्वामी, राकेश क्षीरसागर, ऋषीकेश दिघे, समीर माळवदकर, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली आहे.
