फरासखाना पोलिसांची कामगिरी : दोन गुन्ह्यांतील दोन दुचाकी ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज
बुधवार पेठेमध्ये रात्री मैत्रिणीला भेटण्यासाठी येऊन जाताना वाहनचोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी चोरीच्या गाडीसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने नागरिकांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे व पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद यांनी तपासपथकातील अभिजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना व्यापारी बाजारपेठ भागात पेट्रोलिंग करण्यासाठी आदेशित केले होते.
फरासखाना पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील प्रभारी अधिकारी अभिजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक व तपास पथकातील पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, समीर माळवदकर, अभिनय चौधरी, वैभव स्वामी सचिन सरपाले, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, मोहन दळवी, राकेश क्षीरसागर, महावीर वलटे हे मंगळवारी (०७ सप्टेंबर) फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना ढमढेरे बोळ, बुधवार पेठ पुणे या ठिकाणी दोन संशयित अजय राजू ओव्हाळ, (वय ३२, रा. वटार माळ, वानवडी, पुणे) आणि लक्ष्मण प्रकाश उघडे (वय २७, रा. हंडेवाडी रोड, जे. एफ. सी. एम कॉलेजच्या पाठीमागे आदेशनगर, हडपसर, पुणे) हे ॲक्टिवा गाडीसह मिळून आले. त्यांच्या ताब्यातील दुचाकीबाबत त्यांनी काही कागदपत्रे सादर न केल्याने ती गाडी चोरीची असल्याचा संशय आल्याने दुचाकीबाबत तपास करता ती गाडी फरासखाना पोलीस स्टेशनच्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून सदरची दुचाकी जप्त करण्यात आली.
अटकेदरम्यान आरोपींकडे तपास करता त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यातील चोरीस गेलेली टी. व्ही. एस. कंपनीची नाट्रो १२५ ही दुचाकी गाडी पंचनाम्याने काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अधिक तपास करता, त्यांनी ते दोघे बुधवार पेठमध्ये मैत्रिणीला भेटण्यासाठी येत होते व जाताना रोडवरील पार्क केलेल्या दुचाकी गाड्या चोरी करीत असल्याचे सांगितले. वरीलप्रमाणे आरोपींकडून फरासखाना पोलीस स्टेशनकडील दोन दुचाकी वाहने जप्त करून त्यांच्याकडुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कारवाई ही, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, समीर माळवदकर, अभिनय चौधरी, वैभव स्वामी, सचिन सरपाले मोहन दळवी, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, राकेश क्षीरसागर, महावीर वलटे, हृषीकेश दिघे, सागर राऊत, गणेश आटोळे, रणजित घडशी यांच्या पथकाने केली आहे.
