आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत आरोग्य तपासणी

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • September 10, 2021
Spread the love

लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन व रामभाई शाह रक्तपेढी बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन व रामभाई शाह रक्तपेढी बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सुमारे दीडशे लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात लिओ क्लबचे सल्लागार अ‍ॅड. वासुदेव ढगे, शाह रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, आरोग्य समिती सभापती संदेश काकडे, विभागाचे कर्मचारी शब्बीर वस्ताद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या शिबिरात होमोपॅथिकतज्ज्ञ डॉ. वत्सल राठोड, डॉ. रोहित केंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी अधिकारी व कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली. त्यात प्रामुख्याने रक्तदाब, संपूर्ण रक्ताची चाचणी (सीबीसी) तपासणी सुमारे १०० ते १५० करून मोफत औषध उपचार केले.

प्रास्ताविकात लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ यांनी तपासणी शिबिराचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. मात्र हे काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या उद्देशाने हे लिओ क्लबच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले. शिबिराला लायन्स क्लब अध्यक्ष अजित देशमुख, तेजस्विनी क्लब अध्यक्ष शर्वरी फुरडे, सचिव पल्लवी बजाज यांनी भेट दिली.

शिबिर यशस्वितेसाठी बार्शीच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी यास्फिन अफ्रोज, अपूर्वा मममोटे, योगिता हुंडेकरी, प्रीती राऊत, श्रद्धा हिंगे, संतोष कामे, नवीन बुर्ला यांच्यासह लिओ क्लब बार्शीचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ, सचिव आदित्य सोनिग्रा, मधुर कथले, स्वराज लोखंडे, गौरव देढीया, ऋषभ गुंदेचा व सदस्यांनी परिश्रम घेतले.