चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ६ ते १७ जून २०२१ दरम्यान घडला आहे.
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
ॲमेझॉन, फ्लिपकार्ड अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट कमिशन बेसीसच्या बदल्यात ई-पेद्वारे खरेदी करण्यास सांगून विश्वास संपादन केला. मात्र, फिर्यादीला कमिशन व रक्कम परत करता सुमारे १६ लाख ८ हजार ५० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ६ ते १७ जून २०२१ दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी आशिष भुपेंद्र कुंभानी (वय ३५, रा. खराडी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अज्ञात मोबाईलधारक महिला व इतर १३ आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा वेगवेगळ्या कंपनीचे प्रॉडक्ट कमिशन बेसिस बदल्यात ऑनलाइन ई-पेद्वारे खरेदी करण्यास सांगितले. त्यातून विश्वास संपादन करून व्यवसायातून फिर्यादीचे कमिशन जमा झालेले पैसे मिळविण्यासाठी जीएसटी व व्हॅटची रक्कम आरोपीचे बँक खात्यावर भरण्यास सांगितले. मात्र, फिर्यादीला कोणत्याही प्रकारचे कमिशन दिले नाही, तसेच भरलेली रक्कम परत न देता सुमारे १६ लाख ८ हजार ५८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे करीत आहेत.
