फरासखाना पोलीस स्टेशनची कामगिरी : ४०० ग्रॅम वजनाचा साडेसोळा लाखांचा ऐवज जप्त
पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क
सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिराच्या पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुसक्या आवळण्यास फरासखाना पोलीस स्टेशनला यश आले असून, त्याच्याकडून ४०० ग्रॅम वजनाचा साडेसोळा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
रविवार पेठ पुणे येथील सोन्याच्या मार्केटमधून ५७८ ग्रॅम ७२० मिलीग्रॅम वजनाचे सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिराच्या पश्चिम बंगाल येथून मुसक्या आवळून ४०० ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे.
फिर्यादीने त्यांचेकडील सोन्याचे काम करणारा कारागीर पलास बादलजाना (रा. गोपीनाथपूर, पूर्व मिदनापूर, प. बंगाल) यास दिनांक ०८/०७/२०२१ ते दिनांक २३/०७/२०२१ रोजी दरम्यान पंचवीस लाख पंचावन्न हजार सहाशे सव्वीस रुपये किमतीचे ५७८ ग्रॅम ७२० मिलिग्रॅम वजनाचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले असता, त्याने त्यांना सोन्याचे दागिने बनवून न देता फिर्यादी यांचा विश्वासघात करून सोन्याचे मालाचा अपहार केला म्हणून फिर्यादीने फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता.
दाखल गुन्ह्यातील आरोपीताचा तांत्रिक विश्लेषणावरून शोध घेत असताना तो पश्चिम बंगाल येथे असल्याची माहिती फरासखाना पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार तुषार खडके यांना मिळाली. त्यानुसार फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी फरासखाना पोलीस स्टेशनकडील सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, पोलीस अंमलदार तुषार खडके, रिजवान जिनेडी, संदीप कांबळे, हृषीकेश दिघे यांनी टिम तयार करून त्यांना सदर आरोपीताचा पश्चिम बंगाल येथे जाऊन शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार फरासखाना पोलीस स्टेशनकडील सहायक पोलीस निरीक्षक, मनोज अभंग, पोलीस अंमलदार तुषार खडके, रिजवान जिनेडी, संदीप कांबळे, हृषीकेश दिघे यांना पश्चिम बंगाल येथे जाऊन आरोपी पलास बादलजाना याचा शोध घेतला असता आरोपी त्याचे मूळगावी गोपीनाथपूर, भितरजला, कुरपाई, तुमलक पूर्व मिदनापुर येथे मिळून आल्याने त्यास दिनांक २८ ऑगस्ट रोजी रात्रौ साडेबारा वाजता वातमलुक पोलीस स्टेशन पश्चिम बंगाल येथे अटक केली.
त्यानंतर त्या आरोपीची ट्रान्झिट कस्टडी रिमांड घेऊन त्यास पश्चिम बंगाल येथून पुणे येथे घेऊन येऊन त्याचेकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करून त्याच्याकडून ४०० ग्रॅम वजनाचे १७,६६,०४१ रुपये किमतीचे सोने ऐवजासह जप्त करण्यात आले आहे. दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस अंमलदार तुषार खडके, हृषीकेश दिघे, संदीप कांबळे, रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, सयाजी चव्हाण, समीर माळवदकर, अभिनय चौधरी, वैभव स्वामी, मोहन दळवी, मेहबूब मोकाशी, राकेश क्षीरसागर, महावीर वलटे यांच्या पथकाने केली आहे.
