आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रविंद्र बऱ्हाटेला फरार कालावधीत आश्रय देणाऱ्या वकिलाला जामीन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021
Spread the love

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

एक वर्षाहून अधिक काळ फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे याला आश्रय दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या वकिलाला मोक्का न्यायालयाने 15 हजार रुपयांचा जामीन दिला आहे. अंतर्गत तपासासाठी त्याच्या ताब्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढत विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी हा आदेश दिला.

ॲड. सागर संजय म्हस्के ( वय 32 रा. म्हस्के वस्ती, आळंदी रस्ता) असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. तुषार चव्हाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्यांना ॲड. विपिन मिश्रा आणि ॲड. शंकर कदम यांनी सहाय केले. तो निष्पात आहे. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. तपासासाठी त्याच्या ताब्याची गरज नाही. त्याला मोक्का लागू होत नसल्याचा युक्तीवाद ॲड. तुषार चव्हाण यांनी केला. त्यानुसार न्यालालयने हा निकाल दिला आहे.

या गुन्ह्यात बऱ्हाटे, त्याची पत्नी, मुलासह 21 जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल आहे. बऱ्हाटेवर मोक्कासह एक डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो फरार असताना आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती येथे ॲड.सागर म्हस्के याच्या घरात राहात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ॲड.सागर याला अटक केली आहे. त्याच्यावरही मोक्का, ॲट्रॉसिटीसह भादवीचा विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला. साक्षीदारांशी संपर्क करायचा नाही, गुन्हे शाखा एकचे पोलीस बोलावतील, त्यावेळी तपासास हजर राहण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.