आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्याजाच्या पैशासाठी मारहाण केल्याने एकाची आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021
Spread the love

म्हाळुंगे येथील घटना : आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने प्रकरण उघड

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

व्याजाच्या पैशांसाठी मारहाण केल्याने एकाने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. म्हाळुंगे परिसरात ही घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे मागत होते. त्यांनी तगादा लावला होता. त्रास देऊन मारहाण ही करत होते. या सर्व प्रकाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हंटले आहे.

धंनजय रेड्डी असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सूरज गुरव याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी फिर्याद धंनजय रेड्डी यांचा भाऊ योगेश रेड्डी यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी बंधूची चाकण परिसरात कंपनी असून, ती चालवण्यासाठी पैसे हवे होते. त्यासाठी त्यांनी सूरज गुरवकडून १० लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याचबरोबर अन्य काही लोकांकडूनही त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे घेताना धनंजय याने मध्यस्थी केली होती. दरम्यानच्या काळात परिस्थिती खालावल्याने वेळेत व्याज देता येत नव्हते. त्यामुळे सूरज गुरव याने योगेश यांना गाडीत बळजबरीने बसवून नेऊन त्यांना मारहाण करत धमकावले होते. याच त्रासाला कंटाळून भाऊ धंनजय यांनी बंद फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.