गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी : टाटा अल्ट्रॉसह बत्तीस लाखांचा ऐवज ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
नाशिक येथून आलेल्या दोन गांजा तस्करांना लोहगाव वाघोली रोडवर ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४,३५,००० किमतीचा ७१ किलो ७५५ ग्रॅम गांजाचा साठा आणि टाटा अल्ट्रॉ टेम्पोसह बत्तीस लाखांचा ऐवज जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोन ही कामगिरी केली आहे.
शनिवारी (११ सप्टेंबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार परिमंडळ ४ व ५ हद्दीत सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून जॉन डीअर महालक्ष्मी सर्व्हिस सेंटरच्या समोर असलेल्या वाघोली-लोहगाव रोडवर सार्वजनिक ठिकाणी एक टाटा अल्ट्रा १०१४ गाडीमधून प्रवीण बाळासाहेब वायसे (वय ३१, रा. सिडको शिव चौक, उत्तमनगर नाशिक), योगेश शशिकांत महाजन (वय २५, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) अशा दोन्ही इसमांकडे १४,३५,००० रुपये किमतीचा ७१ किलो ७५५ ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा आणि अठरा लाखांची टाटा अल्ट्रॉ असा एकूण ३२,३५,००० रुपयांचा मुद्देमाल अनाधिकृतपणे व बेकायदा जवळ बाळगताना मिळून आल्याने नमुद दोन इसमांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाणे येथे एन. डी. पि. एस. अॅक्टनुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण हे करत आहेत.
वरील नमुद कारवाई ही, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, प्रभारी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण आणि पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, संदीप शेळके, महेश साळुंखे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, महिला अंमलदार दिशा खेवलकर यांनी केली आहे.
