आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

होळकरवाडीत फ्लॅट फोडून सव्वादोन लाखाची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 14, 2021
Spread the love

चोरीच्या घटनात वाढ : बंदोबस्त वाढवून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

चोरट्याने फ्लॅट फोडून रोख दोन लाख रुपयांसह सोन्या-चांदीचे २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना होळकरवाडीतील समाधान हाईट्समध्ये ११ सप्टेंबर रोजी घडली. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

घनश्यामदास दिवाकर (वय ४४, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, होळकरवाडीतील (ता. हवेली) मेगा कंपनीजवळ समाधान हाईट्स येथील फिर्यादीचा फ्लॅट कुलूपबंद होता. अज्ञात चोरट्यांनी कुलूप उघडून कपाटातील दोन लाख रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत.