आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल फिर्यादींना केला परत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 14, 2021
Spread the love

बार्शी उपविभागातील पोलिसांकडून आठ लाखांचा मुद्देमाल फिर्यादीच्या ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी उपविभागातील पोलिसांकडून विविध गुन्ह्यांतील जप्त आठ लाखांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निर्गती मेळावा कार्यक्रमात फिर्यादींच्या ताब्यात देण्यात आला.

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी आढावा बैठकीमध्ये दिलेल्या आदेशान्वये बार्शी उपविभागातील पोलीस ठाण्यास विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला व निर्गतीवर प्रलंबित असलेला जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याचे अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे आणि काही अधिकारी यांच्या उपस्थिततीत चोरीस गेलेल्या मोटार सायकल, चारचाकी वाहन, मोबाईल हॅण्डसेट व इतर साहित्य असा एकूण ८,०२,५२० रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोमवारी (१३ सप्टेंबर) बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे मुद्देमाल निर्गती मेळावा कार्यक्रम आयोजित करून फिर्यादीस परत देण्यात आला.