आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गांजा विक्री करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 15, 2021
Spread the love

बिबवेवाडी पोलिसांची कारवाई : दोन लाख ६६ हजार रुपयांचा गांजा केला जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख ६६ हजार रुपये किमतीचा १० किलो २५५ ग्रॅम गांजा जप्त केला.

अजिंक्य सुरेश माझिरे (वय २८), प्रवीण सुरेश कांबळे (वय ३०, दोघे रा. भैरवनाथ मंदिराजवळ, खडकवासला, ता. हवेली, जि. पुणे) आणि गांजा विकत घेणारा राहुल प्रभू सोनवणे (वय ३६, रा. पद्मावती वसाहत, पद्मावती, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, अप्पर बस डेपोमधील लाईट हाऊस बिल्डिंगच्या मागे गांजा विक्री करण्यासाठी दोघे येणार असल्याची माहिती बिबवेवाडी पोलीस स्टेशनमधील तपास पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक मते यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांनी सापळा रचून दोघांना आणि गांजा खरेदी करणाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ६६ हजार रुपये किमतीचा १० किलो २५५ ग्रॅम गांजा जप्त केला. आरोपींकडे आणखी गांजा साठा आहे काय याबाबत तपास करण्यासाठी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षिका अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक मते, पोलीस अंमलदार तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, सतिश मोरे, सचिन फुंदे, अतुल महांगडे, राहुल शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.