आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस बांधवांची सेवा करण्याची ही संधी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue, Social • September 19, 2021
Spread the love

उल्हासदादा पवार : स्व.सुभाष लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून फूड पॅकेटचे वितरण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मागील अनेक वर्षापासून सुभाष लोढा हे पोलीस बांधवांना गणपतीमध्ये जेवण देत असत त्यांच्या पश्चात त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून देखील ही पोलीस बांधवांची सेवा करण्याची संधी पुढे चालवली जात आहे, हे कौतुकास्पद आहे. असे मत काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले.

स्व. सुभाष लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून पुण्यातील 5100 पोलीस बांधवांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उद्घाटनप्रसंगी उल्हासदादा बोलत होते. यावेळी बोलताना डीसीपी सागर पाटील यांनी फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, पोलीस ज्यावेळी घरदार सोडून बंदोबस्त करीत असतात त्यावेळी त्यांचा विचार करणारे देखील लोक आहेत हे पाहून काम करण्याचा उत्साह आणखी वाढतो. या फाउंडेशनने दिलेले जेवण हे अतीशय हायजेनिक असून आमचे सर्व पोलीस हे जेवण आवडीने खातील.पुणे पोलिस दलाच्यावतीने मी फाउंडेशनचे आभार मानतो.

एसीपी सुषमा चव्हाण यांनी सुभाष लोढा कशाप्रकारे पूर्वी पोलीस बांधवांना मदत करायचे याची आठवण करून देत आभार मानले. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, संपत भोसले, स्वाती देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे अध्यक्ष हर्षद लोढा, अभिजीत डुंगरवाल, महावीर लोढा, तुषार मुथ्था यांनी केले होते. यावेळी छाया लोढा, राखी लोढा, सपना लोढा, आयुष लोढा, पीयूष लोढा, आदिती लोढा, आदित्य लोढा उपस्थित होते.