आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 20, 2021
Spread the love

वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरासमोर राहणार्‍या अल्पवयीन ४ वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक केली आहे. वारजे येथील रामनगरमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी वारजे पोलिसांनी तेथे राहणार्‍या एका 28 वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे.

याप्रकरणी या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो. त्याने 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आवाजामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. पोलिसांनी तातडीने या नराधमाला अटक केली आहे.