पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती : एक हजार ६६८ पैकी ४२४ गुन्हेगार मिळून आले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गणपती विर्सजनचे अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पाेलीस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्रात शुक्रवारी रात्री नऊ ते शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याचे दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात हॉटेल, लॉजेस, ढाबे, एसटी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयित व्यक्ती व घटनांची कसून तपासणी करण्यात आली. त्याचसोबत तपासणी अभियानात एकूण एक हजार ६६८ गुन्हेगारांना तपासण्यात आले व त्यापैकी ४२४ गुन्हेगार मिळून आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
कोंबिंग ऑपरेशनमध्ये अर्म ॲक्टच्या १५ केसेस करण्यात आले असून, १३ कोयते, दोन तलवार, एक पालघन जप्त करण्यात आली. सात तडीपार आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पाेलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. जबरी चोरीच्या गुन्हयातील एका आरोपीस अटक करुन त्याच्याकडून १५ हजार रुपयांचा माेबाईल जप्त करण्यात आला.
दरोड्याचे तयारीत असलेल्या तीन आराेपींना युनिट सहाच्या पथकाने जेरबंद करत त्यांच्याकडून कारसह दरोडयातील चार लाख रुपये किंमतीचे सामान जप्त करण्यात आले. खंडणी विराेधी गुन्हे शाखेने फरासखाना पाेलीस ठाण्यातील माेक्का गुन्हयातील आराेपी मेहराज शेख यास अटक केली. तर, अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहा केसेस मध्ये २४ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. मुंबई प्रोव्हिबिशन ॲक्टप्रमाणे चार केसेस करत एका आरोपीस अटक करुन १०१ लिटर गावठी दारु व एक टेम्पाे असा तीन लाख रुपयांचा माल जप्त केला.
सीआरपीसी कायदा प्रमाणे १४६ आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त क्षेत्रातील एकूण ५२५ हॉटेल, लॉजेसची तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेने एकूण २२७ रिक्षांवर तसेच इतर ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
यापुढील काळातही काेबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा पाेलीसांनी दिला आहे.
