आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 24, 2021
Spread the love

चाकण, देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये कंटेनर आणि अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चाकण आणि देहूरोड परिसरात दोन भीषण अपघात झाले. या दोन्ही घटनांमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 22) चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


चाकण पोलीस ठाण्यात अनिल फकिरा खंडारे (वय २७, रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. वाशीम) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मित्र नितेश मधुकर जाधव (वय 22, रा. निघोजे. ता. खेड) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा मित्र मयत नितेश जाधव मंगळवारी (दि. 21) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून महाळुंगे येथून जात होता. त्यावेळी आरोपी कंटेनर चालकाने भरधाव वेगात कंटेनर चालवून नितेशच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. कंटेनर नितेशच्या अंगावरून तसेच दुचाकीवरून गेल्याने त्याखाली चिरडून नितेशचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.


दरम्यान, दुसऱ्या घटनेत इरफान नुरमोहम्मद नैसर्गी (वय 38, रा. निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून एका अनोळखी व्यक्तीला जोरात धडक देऊन अपघात केला असून या अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 20) रात्री साडेदहाच्या सुमारास गार्डन सिटीसमोर देहूरोड येथे घडली. देहूरोड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.