आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कम्प्युटरमध्ये छेडछाड करून तेरा लाख रुपयांची फसवणूक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 25, 2021
Spread the love

अज्ञातावर गुन्हा दाखल : मुंढव्यातील सिद्धार्थ पेट्रोल पंपावरील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पेट्रोल पंपावरील मॅनेजरने कम्प्युटरमध्ये छेडछाड करून १२ लाख ९५ हजार ३३३ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मुंढव्यातील स.नं.७१, नोवा अपार्टमेंटशेजारी सिद्धार्थ पेट्रोलपंपावर घडली.

श्रीनिवास जगताप (वय २६, रा. पद्मावती, पुणे) यांनी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी सांगितले की, फिर्यादींचा सिद्धार्थ पेट्रोलपंप आहे. पेट्रोलपंपावरील मॅनेजरने कम्प्युटरमध्ये छेडछाड करून १२ लाख ९५ हजार ३३३ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांतमाने करीत आहेत.