आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बाप रे…. छातीत लाथा घातल्याने तरुणाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021
Spread the love

थेऊरमधील घटना : टेम्पोचालक व दुचाकीस्वारामध्ये किरकोळ भांडण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : टेम्पो चालक आणि दुचाकीस्वारामध्ये किरकोळ अपघात झाला. दोघांमध्ये वाद झाल्याने टेम्पो चालकाने तरुणाला छातीत लाथा घातल्या. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) घडली आहे.

सुंदर पवार (वय-24 रा. आलिफनगर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुंदरचा भाऊ विठ्ठल पवार (वय-35) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक आदित्य सुधीर धाराशिवकर (वय-23 रा. कामधेनु इस्टेट, मंत्री मार्केट समोर, हडपसर) याला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सुंदर आणि त्याचे दोन मित्र दुचाकीवरुन थेऊरच्या दिशेने जात होते. एका मिसळ हॉटेलच्या समोरुन थेऊरच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा सुंदरच्या दुचाकीला कट लागल्याने किरकोळ अपघात झाला. सुंदरने टेम्पो चालकाकडे याबाबत विचारणा केली असता दोघांमध्ये वादावादी सुरु झाली.

यानंतर टेम्पो चालक धाराशिवकर यानं सुंदरच्या छातीत 4 ते 5 लाथा मारल्या. त्यामुळे सुंदर जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. त्यावेळी टेम्पो चालक पळून जात असताना सुंदरच्या मित्रांनी त्याला पकडून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुंदरला टेम्पोमध्ये घालून तात्काळ थेऊर येथील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने त्याला लोणी स्टेशन येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून सुंदरला मृत घोषीत केले.