आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शुक्रवारी एक ऑक्टोबर रोजी सोलापुरात होणार सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची लेखी परीक्षा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

प्रवेशपत्रासाठी लिंक खुली : सोबत काय आणू नये याबाबत कडक सूचना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : शुक्रवारी एक ऑक्टोबर रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थपनेवरील रिक्त असलेल्या जागांवर पोलीस भरती २०१९ ची लेखी परीक्षा होणार असून, त्यासाठीच्या प्रवेशपत्रासाठी लिंक खुली करण्यात आली आहे. परीक्षेला येताना सोबत काय आणावे आणि काय आणू नये, याबाबत कडक सूचना दिल्या आहेत.


सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थपनेवरील रिक्त असलेल्या ४१ चालक पोलीस शिपाई पदाच्या भरतीकरिता सन २०१९ मध्ये जाहीरात देण्यात आली होती. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा शुक्रवारी एक ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे. लेखी परिक्षेकरीता या दिवशी सकाळी आठ वाजता हजर राहावयाचे असून, सकाळी साडेनऊच्या नंतर कोणत्याही उमेदवारास परीक्षाकक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

सदर परीक्षेकरिता उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र (हॉल टिकीट) २७ सप्टेंबरपासून http://mahapolicerc.mahaitexam.in/phaseone या लिंक वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्र, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म व उमेदवारांकरिता सूचना अशी चार पाने सोबत येताना आणावयाची आहेत. परीक्षेसाठी येताना सोबत काय आणावे आणि काय आणू नये याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

परीक्षेसाठी येताना सोबत हे आणा….
१. प्रवेशपत्र ( HALL TICKET) पूर्ण चैर पानांसहित
२. काळा / निळा बॉलपेन
३. अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो
४. वैध ओळखपत्र – ( आधारकार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हींग लायसन्स / पासपोर्ट)

परीक्षेसाठी येताना सोबत हे आणू नका…
१. मोबाईल फोन
२. स्मार्ट वॉच / घड्याळ
३. इलेक्ट्रीक उपकरणे
४. कॅल्क्युलेटर
५. ब्लू टुथ
(टीप : हे साहित्य सोबत आणल्यास ते जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.