आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने अंगठ्या चोरणारी ‘बबली’ जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

गुन्हे शाखेच्या युनिट-४ची कारवाई : ८८ हजार रुपयांच्या दोन अंगठ्या व स्कूटर केली जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या महिलेला पुणे गुन्हे शाखा युनिट-४च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेने ही कारवाई विश्रांतवाडी येथील बीआरटी बसस्टॉप येथे केली. सदर आरोपी (रा. तुकाराम नगर, चंदननगर, खराडी) राहत असून आरोपीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्श्वनाथ ज्वेलर्स येथे हातचलाखीने दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्या होत्या. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना युनिट-४चे पोलीस अंमलदार राकेश खुणवे व अशोक शेलार यांना ही महिला चंदनगर खराडी भागात राहात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार महिलेला विश्रांतवाडी येथील बीआरटीएस बसस्टॉप येथे सापाळा रचून ताब्यात घेतले. तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी महिलेकडून 88 हजार रुपये किमतीच्या 19 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या आणि गुन्ह्यात वापरलेली स्कुटर असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासासाठी महिलेला विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.