आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेसह तिघांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 30, 2021
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : उंड्री येथील महावितरण कार्यालयात घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वीज बील भरले नसल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लाईटचे मिटर काढून नेले. यामुळे चिडलेल्या तिघांनी महावितरण कार्यालयात येऊन कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार कोंढव्यामध्ये घडला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महावितरणच्या गंगा व्हिलेज सेक्शन उंड्री येथील कार्यालयात सोमवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास घडला.

सचिन कौल (वय-40), एक अनोळखी व्यक्ती (वय-45), अनोळखी महिला (वय-27) यांच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ तंत्रज्ञ सुरेश राजाराम पवार (वय-39 रा. फुरसूंगी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्याकडे वीज बिल वसुलीचे काम सोपवण्यात आले आहे. आरोपी सचिन कौल याने त्याचे विजबील भरले नसल्याने फिर्यादी यांनी न्याती इंटरनिटी सोसायटी येथील त्यांचे विजमीटर काढून नेले. वीज तोडल्याने तिघे आरोपी महावितरणच्या गंगा व्हिलेज कार्यालयात गेले. त्याठिकाणी फिर्यादी यांना शिवीगाळ करत धमकावले. तसेच आरोपींनी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जीवे मारु अशी धमकी देऊन पसार झाले.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. जाधव करीत आहेत.