आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जुन्या भांडणातून कोयत्याने वार करून फरार झालेले दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 30, 2021
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : विधिसंघर्षित बालक ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने वार करून फरार झालेल्या आरोपींना सातारा येथून अटक केली असून, विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ही कामगिरी केली.

अभिषेक लोंढे (वय १९, रा. मानस सुपर मार्केट, सिद्धी अपार्टमेंट, नऱ्हे आंबेगाव, ता. हवेली, जि. पुणे, मूळ वडवणी, ता. आष्टी, जि. बीड), आकाश शिंदे (वय २५, रा. खेड-शिवापूर दर्ग्याजवळ, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहे.

पोलिसांनी सांगितले की, दत्तनगर येथील मोकळ्या जागेत २३ सप्टेंबर २०२१ रोजी फिर्यादी रोहन भुरुक याला तीन-चार आरोपींनी जुन्या भांडणातून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून फरार झाले होते. गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्ह्यातील आरोपी सातारा येथे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील दोन तपास पथकांनी घटनास्थळी जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपासासाठी पोलीस कस्टडी घेण्यात आली असून, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.