पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांचे आदेश आणि सहकार्याचे आवाहन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत ऑक्टोबर अखेरपर्यंत वाहतुकीत बदल केल्याचा आदेश पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी काढला असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पुणे शहरातील समर्थ वाहतुक विभागाचे हद्दीत में ख्वाजा गरीब नवाज एंटप्रायजेस यांचे वतीने प्रभाग क्र १९ क, जुना मोटार स्टॅण्ड ते अलंकार मेडिकल येथे मुख्य मलवाहिनी टाकणेकरीता रस्ता खोदकामाकरिता दिनांक ०१ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२१ रोजीपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए.०१९६/८७१/ सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५ ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये बदल करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने समर्थ वाहतुक विभागातील वाहतुकीत प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरते स्वरुपात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहेत. सदर वाहतूक बदलाबाबत वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतुक शाखा यांचे मार्फतीने करण्यात आले आहे.
हे आहेत वाहतुकीतील बदल…
1) रामोशी गेट चौकाकडून कॅम्पकडे जाण्यासाठी जुना मोटार स्टॅड येथून डावीकडे वळून – पद्मजी चौक पुढे इच्छित ठिकाणी जाऊ शकतात.
2) कॅम्पमधून येणारी वाहतूक ही अलनायब हॉटेल येथून उजवीकडे वळून कुरेशी मस्जिद डावीकडे वळून बाबाजान चौक पुढे इच्छित ठिकाणी जाऊ शकतात.
