आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोरोनानंतर भरलेल्या शाळेच्या पहिल्याच दिवशी समर्थ पोलिसांनी घेतला इयत्ता दहावीचा वर्ग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 5, 2021
Jully 2019 Issue4 1

वर्गात जाऊन घेतली विद्यार्थ्यांची स्वैच्छा भेट : विविध विषयांवर केले मार्गदर्शन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पाच ऑक्टोबरच्या पोलीस शिपाई पदाच्या परीक्षेच्या निमित्त परीक्षा केंद्राला भेट दिल्यावर दीड वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच भरलेल्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना समर्थ पोलिसांनी वर्गात स्वैच्छा भेट देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हजर होते.

दि. चार ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस हवालदार जितेंद्र पवार, पोलीस शिपाई बेळगे, सागर हराळ असे समर्थ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेली बी. टी. सहाणी माध्यमिक शाळा, भवानी पेठ, पुणे या ठिकाणी पोलीस भरती परीक्षा केंद्रास भेट दिली. त्यावेळी त्याठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पेशवानी यांच्यासह परिक्षा हॉलची पाहणी करीत असताना कोविड १९च्या प्रादुर्भावानंतर (सुमारे दीड वर्षानंतर) आज शाळा सुरू झाल्याने शाळेचा प्रथमच दिवस असून इयत्ता दहावीच्या वर्गाला भेट दिली.

शाळेचे प्राचार्य सुरेश पेशवानी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताम्हाणे यांना वर्गातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याबाबत विनंती केल्याने, ताम्हणे यांनी मार्गदर्शन करीत असताना रिल लाईफ (पडद्यावरील जीवन) व रियल लाईफ (खरे जीवन) यातील फरक सांगून जीवनाच्या वास्तवाबाबत माहिती सांगितली.

त्याचबरोबर आजची शाळकरी मुले ऑनलाईन शिक्षणाच्या सबबीखाली मोबाईलच्या आहारी जात असल्याने त्याच्यामुळे होत असलेल्या दुष्परिणामबाबत माहिती विशद केली, तसेच महिला व मुली यांच्यावर होणारे अत्याचारांवर मात करणेसाठी घ्यावयाची दक्षता व त्याबाबत कसा प्रतिबंध करावयाचा, याबाबत मार्गदर्शन केले.

सदृढ पिढी घडण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक असून, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्नीपंख’ व ‘असे घडवा तुमचे भविष्य’ ही पुस्तके वाचावीत, जेणेकरून तुमचे आयुष्यातील ध्येय साध्य करणेसाठी उपयुक्त हाईल. कोरोनामुळे बरीच मुले व पालक यांच्यात नैराश्य येत आहे, त्यावर मात करणे गरजेचे असून, नैराश्य आल्यास मुलांची मानसिकता बिघडून जाते, अशावेळी नैराश्यावर मात करणेसाठी डॉ. दत्ता कोहिनकर यांचे ‘मनाची मशागत’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल, असे सांगितले.

पोलीसकाका मुलांना शिकवत आहेत, याचे मुलांना विशेष कुतूहल वाटले व पोलिसांनी घेतलेला वर्ग मुलांना चांगल्यारीतीने आवडला.

05 10 2021 10
get_footer();