आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बंगला बांधून देण्याच्या आमिषाने पावणे दोन कोटीची फसवणूक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 8, 2021
Spread the love

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये महिलेसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बंगलो प्लॉटवर बंगला बांधून देण्याच्या आमिषाने एकाची 1 कोटी 65 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पेश अरविंदभाई पटेल, अरविंदभाई लालजीभाई पटेल, सुधाबेन अरविंद पटेल आणी हेलत अल्पेश पटेल(सर्व रा.मगरपट्टा, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नंदकुमार हुकमतराय मोटवानी (80, रा.वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींच्या नावावर असलेल्या प्लॉटवर बॅंकेचे कर्ज आहे. ही कर्जाची बाब त्यांनी फिर्यादीपासून लपवून ठेऊन त्यांना प्लॉटवर बंगला बांधून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी मध्यस्थ व एजंट म्हणून भूमिका घेत फिर्यादीकडून 1 कोटी 65 लाख रुपये घेतले. त्यानंतर 2015 पासून आजपर्यंत त्यांना कोणतेही बांधकाम करुन दिले नाही. तसेच त्यांनी दिलेले पैसेही परत दिले नाहीत.

त्यांनी दिलेली रक्कम आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता इतर उद्योग धंद्यात गुंतवली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव करत आहेत.