आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आईचा खून करून फरारी झालेल्याच्या २४ तासांत आवळल्या मुसक्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 15, 2021
Spread the love

बार्शी पोलिसांची कामगिरी : रत्नागिरीतील पोलिसांच्या मदतीने आरोपीला पकडले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आईचा खून करून फरार झालेल्या आरोपीला बार्शी पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले. पैशासाठी खून करून आरोपी फरार झाल्याची फिर्याद बार्शी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती.

श्रीराम नागनाथ फावडे (वय २१, रा. वाणी प्लॉट, ता. बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी बार्शी पोलीस स्टेशनमद्ये गुन्हा दाखल केला होता.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस हिंमत जाधव यांच्या सूचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. आ. शेळके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक डी. डी. उदार यांना आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांच्या दोन टीम तयार करून मुंबई व रत्नागिरी येथे पाठविल्या. आरोपी श्रीराम नागनाथ फावडे हा रत्नागिरीतील भाटये पुलावर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली, त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीची चौकशी केली असता मयत रुक्मिणी ही त्याची आई असून, पैशावरून तिच्याशी वाद होत होते, पैसे देत नव्हती त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात आईच्या डोक्यात दगड मारून जीवे मारल्याची कबुली दिली.

पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, सहायक पोलीस निरीक्षक डी. डी. उदार, पोसई सिरसाट, वरपे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वाघमोडे, पोना ठेंगल, पवार, पोलीस कॉन्स्टेबल लगदिवे, घोंगडे, बारगिर, गोसावी, मपोना काळे सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.