• महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
Friday, April 24, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

ॲडमिशन देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्यांवर गुन्हा

November 30, 2023
0
May 2017 Issu16
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

निवृत्त प्राचार्यासह चौघांचा समावेश : खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयातील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खडकवासला येथील डी.आय.टी. गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून तब्बल १७ लाख ६० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त प्राचार्य व त्यांच्या मुलासह चौघांवर हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रदीप सद्य सांगोले आणि त्यांचा मुलगा शुभम प्रदीप सांगोले (रा. गजानन कॉलनी, गोंदिया), अनंता मधुकर लायगुडे (रा. गोऱ्हे खुर्द, ता. हवेली) आणि विठ्ठल श्रीरंग थोपटे (रा. खानापूर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश रमेश राऊत (वय ४१, रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली) यांनी हवेली पोलीस ठाण्यात ( गु. र. नं. २३४/२१) फिर्याद दिली आहे.

निलेश राऊत हे लष्करातून सेवा निवृत्त झाले असून सध्या गोऱ्हे बुद्रुक येथे व्यवसाय करतात. तर प्रदीप सांगोले हे गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात प्राचार्य होते. प्राचार्य व त्यांचा मुलगा शुभम यांनी अनंता लायगुडे व विठ्ठल थोपटे यांच्या मदतीने मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून लोकांकडून पैसे उकळले. निलेश राऊत यांच्या मुलाला प्रवेश मिळवून देण्यासाठी २० एप्रिल २०२१ रोजी ९० हजार रुपये घेतले. याशिवाय इतरांकडून एकूण १७ लाख ६० हजार रुपये घेतले. हे पैसे घेतल्यानंतर प्रदीप सांगोले हे सेवानिवृत्त झाले. त्यांनी मुलांचे ॲडमिशन करुन दिले नाही.

फिर्यादी व इतरांनी पैसे परत मागितल्यावर पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. पैसे परत देत नसल्याचे आता लोकांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे अधिक तपास करीत आहेत.

16 10 2021 4
Download

Latest Articles

‘ऑपरेशन फ्लश आऊट’मध्ये १२ दिवसांत १६६ गुन्हे दाखल

वशीकरणाचे प्रयोग करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

April 24, 2026
१९ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

१९ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

April 24, 2026
व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

April 23, 2026
सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

April 23, 2026
नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

April 23, 2026
Load More
Previous Post

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

फ्लॅट परस्पर विकून महिलेला १८ लाखांना फसविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT USAddress :

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta