आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चोरी गेलेले 42 मोबाईल केले नागरिकांना परत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 16, 2021
Spread the love

लष्कर पोलिसांची कामगिरी : महागडे मोबाईल मिळाल्याने मानले आभार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहर परिसरातून चोरी गेलेले ४२ मोबाईल फोन लष्कर पोलिसांकडून नागरिकांना परत करण्यात आले. मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करून लष्कर पोलिसांकडून ही कामगिरी करण्यात आली. ४ लाख ७५ हजार एवढी या मोबाईलची किंमत आहे.

लष्कर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी (दि.१४) नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्यांना हे मोबाईल परत देण्यात आले. महागडे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविदास जांभळे, सहायक निरीक्षक मनमीत राऊत, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, अंमलदार गणेश कोळी, मंगेश बोराडे, पवन भोसले, सचिन मांजरे, महेश कदम, मंगल लाकडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.