• महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
Friday, April 24, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

टपरीचालकावर कोयत्याने वार करणारे रावण गँगमधील एक अटकेत

November 30, 2023
0
May 2017 Issu46
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हा : कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या मागे घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : टपरी मधून 200 रुपयांचा गायछाप तंबाखू व सिगारेट खरेदी केल्यावर त्याचे पैसे टपरी चालकाने मागितले असता तिघांनी मिळून टपरी चालकाला ‘तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहोत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत’ असे म्हणत पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर टपरी चालकावर कोयत्याने वार करून त्यास जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी दोन वाजता कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या मागे घडली.

तुषार संतोष धेंडे (वय 18, रा. कासारवाडी) असे जखमी टपरी चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुक्तार तांबोळी (वय 23), आतिष उर्फ बंटी गावडे (वय 22), बसुराज यमनाप्पा धोतरे (वय 20, सर्व रा. कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुक्तार तांबोळी याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आतेभावाची कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे पान टपरी आहे. आरोपींनी टपरीमधून 200 रुपयांच्या गायछाप तंबाखू आणि ब्रिस्टॉल सिगारेट खरेदी केल्या. फिर्यादी यांनी आरोपींना पैसे मागितले असता आरोपींनी ‘तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहोत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत’ असे म्हणत पैसे देण्यास नकार दिला.

‘मी गरीब आहे. माझे पैसे देऊन टाका’ असे फिर्यादी यांनी सांगितले असता आरोपी आतिष याने गचांडी पकडून फिर्यादी यांना टपरीच्या बाहेर ओढले. आरोपी मुक्तार आणि बसुराज या दोघांनी हाताने मारहाण केली. मुक्तार आणि आतिष यांनी कमरेचा कोयता काढून फिर्यादी यांच्या हातावर वार करून जखमी केले.

दरम्यान फिर्यादी यांनी रस्त्याने येणा-या-जाणा-या लोकांकडे मदत मागितली असता आरोपींनी ‘तुझ्या मदतीला कोण येते तेच पाहतो. असे म्हणत आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. आरोपींनी टपरी मधून 400 रुपये जबरदस्तीने चोरून नेले. फिर्यादी यांनी आरोपींच्या तावडीतून सुटून पळ काढला असता आरोपी बासुराज याने दगड व विटांनी मारून फिर्यादी यांना दुखापत केली. याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

16 10 2021 6
Download

Latest Articles

तोतया पोलिसाने नोकरीच्या अमिषाने घातला गंडा

तोतया पोलिसाने नोकरीच्या अमिषाने घातला गंडा

April 24, 2026
अल्पवयीनाकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

अल्पवयीनाकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

April 24, 2026
‘ऑपरेशन फ्लश आऊट’मध्ये १२ दिवसांत १६६ गुन्हे दाखल

वशीकरणाचे प्रयोग करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

April 24, 2026
१९ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

१९ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

April 24, 2026
व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

April 23, 2026
Load More
Previous Post

चोरी गेलेले 42 मोबाईल केले नागरिकांना परत

Next Post

एमपीएससीच्या क्लासला जाणाऱ्या विवाहितेचा भर रस्त्यात विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT USAddress :

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta